शनिवारी दुचाकी वरील दोन भामट्यानी शहरातील विविध भागात तीन महिलांचे सोन्याचे दागिने थाप मारून पळविल्याच्या घटनेनंतर हे कृत्य इराणी टोळी कौन करण्यात आले असावे असा संशय पोलिसांना आहे. या टोळीच्या शोधासाठी गुन्हेशाखेचे दोन पथक तैनात करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपूर्वी इराणी टोळीने अशाच प्रकारे पोलीस असल्याची थाप मारत शहरातील अनेक महिलांचे दागिने लंपास केले होते. हि टोळी रेल्वे स्थानकाच्या जवळील रहिवाशी भागात अशा गुन्हेगारी कारवाया करतात व नंतर रेल्वेने पसार होतात. शनिवारी मोटारसायकलीवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी भामट्यानी पुंडलिकनगर सिडको मुकुंदवाडी अशा तीन ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या महिलांना पुढे दंगल सुरु आहे तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आमच्याकडे द्या अशी थाप मारत दागिने लंपास केले. या नंतर पोलिसांनी पाहणी केली असता एका घराच्या सीसीटीव्ही मध्ये हेल्मेटधारी भामटे कैद झाले आहे . हे दोन्ही भामटे इराणी टोळीचे असू शकतात त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे दोन पथक नेमण्यात आले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे साह्यक आयुक्त डॉ .नागनाथ कोडे यांनी दिली आहे.